नवी दिल्ली, 10 : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात कथ्थक नर्तक व भारत सरकार कडून
प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2020 पुरस्कार प्राप्त डॉ. पं.नंदकिशोर कपोते यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राला आज सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर
अरोरा यांनी डॉ. कपोते यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर
यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पंडीत कपोते
यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. तरुण वयापासून त्यांनी दिल्लीत पं. बिरजू महाराज यांच्या घरी
दहा वर्षे वास्तव्य करुन नृत्यशिक्षण
घेतले.सद्या ते डी.वाय पाटील विद्यापीठ ,पुणे येथे लिबरल आर्टस् विभागाचे संचालक
आहेत व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीचे मानद सल्लागार आहेत. पिंपरी
चिंचवडमधील यमुनानगर (निगडी) येथे त्यांची ‘नंदकिशोर कल्चरल सोसायटी’ नावाची गायन, नृत्य, वाद्यवादन, हिंदुस्तानी
शास्त्रीय कंठ संगीत, कर्नाटक कंठ संगीत आदी कला शिकवणारी
संस्था आहे. त्यांनी कथक नृत्यात पी.एच.डी मिळवली असून ते दूरदर्शनचे ए ग्रेड प्राप्त कथ्थक नर्तक
आहेत. त्यांचे अमेरिका, कॅनडा, कुवेत,
जपान, रशिया, हॉलंड आदी
देशांमध्ये तसेच मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनवर कथ्थक नृत्याचे अनेक कार्यक्रम झाले
आहेत.
यावेळी
श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रकाशित करण्यात येणारी
प्रकाशने,
प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या
सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध
राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती
दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या
विविध उपक्रमांची माहितीही दिली. डॉ. कपोते यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल
समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment