नवी दिल्ली, 6: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ऑनलाइन व्याख्यान आज आयोजित करण्यात आले.
न्यूज नेशन मराठी चॅनलचे माध्यम प्रतिनिधी श्री प्रथमेश तेलंग यांनी त्यांच्या विशेष व्याख्यानातून शिवरायांच्या वैविद्यपूर्ण व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दूरदर्शीपणा, त्यांची शिस्तबद्धता, पारदर्शी प्रशासकीय यंत्रणा, महिलांचा सन्मान,सर्व धर्म समभाव तसेच शक्तीला युक्तीची जोड देऊन रयतेचा आदर्श राजा कसा असावा असे सांगून यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वाच्या वेगवेगळया पैलुंवर प्रकाश टाकला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाकडून 1 जून ते 6 जून या कालावधीत राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या सोहळ्यानिमित्त २ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले.
*************
अमरज्योत कौर अरोरा /वृवि.100/6.6.2023
No comments:
Post a Comment