संगीत
नाटक अकादमी अमृत पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
नवी दिल्ली, 16
: संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या, ज्या कलाकारांना
त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान न मिळालेल्या 84 कलाकारांना
विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून
यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे.
लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर,
कथ्थकसाठी चरण गिरधर चाँद व डॉ. पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम
खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र
प्रभाकर बोरकर या मान्यवरांचा कला क्षेत्रातील
योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत 75 वर्षांवरील
84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिग्गज कलाकारांमध्ये
70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात वयस्क मणिपूरचे
101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. या यादीत गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम
चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.
पुरस्कार प्राप्त या कलाकारांत आंध्र प्रदेश,गुजरात,तेलंगणा ,उत्तरप्रदेशतील तीन, पंजाब, दिल्ली, पुडूचेरी, अरुणाचल प्रदेशातील दोन, महाराष्ट्रातील सात, आसाम ,तामिळनाडू,केरळ, राजस्थानातील पाच , बिहार,कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिसातील चार , गोवा, जम्मू काश्मीर, झारखंड ,लदाख ,लक्षद्विप ,छत्तीसगड ,मेघालय, सिक्कीम, त्रिपुरामधील प्रत्येकी एक कलाकारांचा यात समावेश आहे. ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
00000000000000
-पुरस्कार
विजेत्यांबाबतची माहिती-
* डॉ. प्रभाकर भानुदास
मांडे *
श्री प्रभाकर भानुदास मांडे यांना त्यांच्या
मराठी लोककलातील विद्वत्तेबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोकसंस्कृती आणि साहित्याचे
ज्येष्ठ संशोधन अभ्यासक आहेत. त्यांनी 17 वर्ष मराठवाडा विद्यापीठात रीडर म्हणून
काम केल्यानंतर 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गांवगड्या
बाहेर, रामकथेची मौखिक परंपरा, लोक रंगभूमी, मागणी त्याचे मांगते, सहित अनेक
पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या विविध प्रकाशनातून त्यांनी प्रचलित ज्ञान आणि
कलेचे लपलेले पैलू शहरी लोकांसमोर आणले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
पदव्युत्तर स्तरावरील या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
* डॉ. पद्मजा शर्मा *
कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डॉ. पद्मा
शर्मा यांना संगीत नाटक अकादमी अमृत
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पद्मा शर्मा यांनी 1959 मध्ये भातखंडे
महाविद्यालयातून कथ्थकमधील नृत्य निपुराण ही पदवी
मिळवली होती. त्यांनी मुंबईतील ललित कला एज्युकेशन ट्रस्टमध्ये नृत्य
शिक्षक आणि कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. त्या वल्लभ संगीत विद्यालय,
मुंबईच्या नृत्य विभागाच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
* शंकर कृष्णाजी अभ्यंकर
*
श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत सितारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांचा जन्म 1934 साली महाराष्ट्रातील सातारा येथे झाला, त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ सतार वादनात अलंकार ही पदवी मिळवली. त्यांचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी असून त्यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून बंदिश आणि रचनेचे प्रशिक्षण घेतले आणि पंडित रविशंकर यांच्याकडून सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले.
No comments:
Post a Comment