नवी दिल्ली, 28: 'मेरी माटी मेरा
देश' अर्थात 'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून एकत्र केलेल्या
मातीचे अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वर दुपारी 2.30 वाजता
दाखल झाली.
याबाबतचा राज्यास्तरीय सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत ऑगस्ट
क्रांती मैदानावर पार पडला होता.
अमृत कलश यात्रेसाठी
राज्यातून 414 कलश घेऊन आलेल्या 881 स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेने शुक्रवारी
मुंबई सेंट्रल रेल्वे येथून दिल्लीकडे मार्गस्थ झाली होती. मुख्यमंत्री यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा
दाखवला होता.
अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन येथे दाखल झाली.
यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी
प्रतिष्ठान या संस्थेने स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने
दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात
आलेल्या देशव्यापी मेरी माती मेरा देश मोहिमेची सांगता 31 ऑक्टोबर 2023 रोजी होणार
आहे. देशभरातून गोळा केलेले अमृत कलश दिल्लीतील
कर्तव्यपथ इथल्या अमृतवाटिका इथे संकलित करून समारंभपूर्वक स्थापन केले जाणार आहेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वनिसंगीताचा समारंभ होणार आहे.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment