नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात
आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज
ध्वजारोहण करण्यात आले.
कस्तुरबा
गांधी मार्गस्थित आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ गाऊन ध्वजवंदन केले.
या
कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागंत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी
आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
******************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.57/ दिनांक 01.05.2024






No comments:
Post a Comment