नवी दिल्ली, 30: लोकसभा
खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी महाराष्ट्र
परिचय केंद्राला आज सदिच्छा भेट दिली.
परिचय
केंद्राच्या उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ व
शाल देऊन स्वागत केले. कार्यालयातील
सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी
श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रकाशित करण्यात
येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा
समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात
येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. महाराष्ट्र सदनातील खासदार समन्वय कक्षाद्वारे लोकसभा
सदस्यानां विविध स्वरूपाच्या सुविधाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय
केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. भिवंडी मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले खासदार
श्री म्हात्रे यांना यावेळी
महाराष्ट्राची लोकसभा पुर्वपिठिका -2024 ची प्रत व “लोकराज्य” मासिकाची प्रत भेट करण्यात आली. त्यांनी परिचय
केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
*************************
आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.91 / दिनांक 30.07.2024





No comments:
Post a Comment