Sunday, 12 January 2025

राजधानीत राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी











नवी दिल्ली, 12 जानेवारी : राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदन निवासी आयुक्त नीवा जैन यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना पुष्पांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, श्रीमती स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.06 / दिनांक 12.01.2025

 

No comments:

Post a Comment