नवी
दिल्ली, दि. 11: राजधानी मध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे महत्त्वाचे
कार्य गेली 65 वर्ष महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या माध्यमातून होत आहॆ. या कार्यालयाने विविध उपक्रम राबवून मराठीजणांना सहकार्य
करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी परिचय
केंद्राच्या सदिच्छा भेटी दरम्यान केले.
परिचय केंद्राच्या
प्रभारी उपसंचालक (माहिती) मनिषा पिंगळे यांनी
श्रीमती आर. विमला यांचे स्वागत केले. नुकतीच प्रकाशित झालेली खासदार पुस्तिका ही त्यांना
भेट देण्यात आली. माहिती केंद्राने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रम, प्रकाशने, तसेच
मेळावे यांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र
परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून येत्या काळातील विविध उपक्रमांबाबत
सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रीमती आर.
विमला यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. केंद्राच्या ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके आणि संदर्भ साहित्याची
त्यांनी प्रशंसा केली. भेटीनंतर त्यांनी अभिप्राय नोंदवताना लिहिले, “महाराष्ट्र परिचय केंद्र,
नवी दिल्ली येथे भेट देण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक ठरला. केंद्रातर्फे प्रकाशित
पुस्तके आणि ग्रंथालयातील साहित्य उत्तम आहे. केंद्राचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा.” या अभिप्रायातून त्यांनी केंद्राच्या
कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी माहिती अधिकारी
अंजु निमसरकर कांबळे, लघुलेखक कमलेश पाटील, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रामेश्वर
बरडे, सहाय्यक अधीक्षक राजेश पागदे, सहायक ग्रंथपाल निलेश देशमुख, वरिष्ठ लिपिक प्रशांत
शिवरामे, उदय वीर सिंग, किशोर वानखेडे, पाले, किशोर गायकवाड, आमिका महतो, दीपक देशमुख
हे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
000000000000
अंजू निमसरकर – माहिती
अधिकारी /
वृत्त विशेष -129
आम्हाला फॉलो करा
एक्स -




No comments:
Post a Comment