नवी दिल्ली, दि.17 : उद्योग क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ महाराष्ट्रात वाढत आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2015 या केवळ आठ महिन्याच्या काळात राज्यात 55 हजार 307 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीतून 1 लाख 23 हजार 740 इतका रोजगार निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रातील केलेल्या धोरणात्मक बदलांचा विधायक परिणाम आता दिसू लागला आहे. उद्योग उभारणीसाठी लागणार्या परवाणग्यापासून ते एक खिडकी योजने पर्यंत उद्योगांना पोषक असे वातावरण महाराष्ट्राने तयार केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदेशात जाऊन महाराष्ट्राची तयार केलेली प्रतिमा आणि विदेशी गुंतवणुकीस महाराष्ट्राने राबविलेले विशेष धोरण या विषयी विदेशी उद्योगजगतात त्यांनी केलेली चर्चा यामुळेच केवळ आठ महिन्यात महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात स्वित्झरलॅण्ड, जर्मनी, चीन, अमेरिका आणि तैवान या पाच देशातील 18 कंपन्यांनी एकूण 55 हजार 307 कोटीची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून राज्यात 1 लाख 23 हजार 740 इतकी रोजगार निर्मिती झाली आहे.
स्वित्झरलॅण्ड च्या हिल्टी, कॉग्नीझंट, टोरे, ह्योसंग, शिंदलर, जनरल इलेक्ट्राक्स या सहा कंपन्यांनी मिळून 5 हजार 310 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे. जर्मनीच्या आयकेईए व थायसेनकृप या दोन कंपन्यांनी 2 हजार कोटी तर चीन च्या फॉक्सकॉन, हेरर, हाकब्रश, तैयुवान हेवी इंडस्ट्री कंपनी लीमिटेड या चार कंपन्यांनी राज्यात 1 हजार 597 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेच्या पंचशील-ब्लॅकस्टोन, कोकाकोला, जनरल मोटर्स व सिटीबँक या चार कंपन्यांनी 11 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या कंपनीने महाराष्ट्रा सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. या कपंनीने 35 हजार कोटीची गुंतवणूक केली आहे. यातून 50 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही गुंतवणूक चाकण, पुणे, रांजणगाव, चिपळूण, केसुर्डी-सेझ पुणे या भागात करण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात झालेल्या गुंतवणुकीमुळे 1 लाख 23 हजार 740 इतका रोजगार निर्माण होईल असा अंदाज आहे. तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलीजीने 35 हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रत केली आहे. यातून 50 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. अमेरिकेची सिटीबँक पुण्यात 4 हजार इतकी रोजगार निर्मिती करणार आहे तर स्वित्झरलॅण्डची एसक्यूएस ही कंपनीही पुण्यात 4 हजार रोजगार उपलब्ध करणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग उभारणीसाठी योग्य धोरण व उद्योगाला पोषक वातावरण यामुळे गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार तसेच विदेशात त्यांनी केलेली राज्याची प्रतिमा यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मिती होत आहे.
No comments:
Post a Comment