नवी दिल्ली, दि.18: 35 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील
महाराष्ट्र दालनास आज थाई शिष्टमंडळाने भेट दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राने
प्रदर्शित केलेल्या प्रदर्शनासही या शिष्टमंडळाने भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी
केली.
येथील प्रगती मैदानात सुरू
असलेल्या व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनास भेट देणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत
आहे. ‘मेक-इन-महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत हे प्रदर्शन
गुंतवणूकदार व शिष्टमंडळाचे आकर्षण ठरले आहे. आज महाराष्ट्र दालनात महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने एका ‘टाक शो’ चे आयोजन करण्यात
आले होते. या टॉकशोमध्ये थाई शिष्टमंडळाने भाग घेतला. शिष्टमंडळा समवेत खासदार आनंदराव
अडसूळ उपस्थित होते.
थाई शिष्टमंडळाने महाराष्ट्र दालनातील महाराष्ट्रपरिचय केंद्राच्या प्रदर्शनास आवर्जून भेट दिली. गेल्या एका वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील
विकास कामांवर आधारित हे प्रदर्शन आहे.
राज्य शासनाच्या प्रगतीचे प्रदर्शन पाहून थाई
शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी थाई फेडरेशन इंडस्ट्रिजचे उपमहासचिव अशोक
उपाध्य, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक वैदेही रानडे,
प्रादेशिक अधिकारी शारदा पोवार आदी उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment