Thursday, 26 November 2015

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा



 नवी दिल्ली, 26 :  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला.  
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उददेशिकेचेआम्ही, भारताचे लोक.... सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; स्वत:प्रत अर्पण करीत आहोत असे सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र,अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    
                   महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रातसंविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचा-यांनी  राज्य घटनेच्या उददेशिकेचे सामुहिकपणे वाचन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार,लघु लिपीक कमलेश पाटील यांनी राज्य घटनेच्या उददेशिकेच्या महत्वाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.    
                                                                       00000

No comments:

Post a Comment