नवी
दिल्ली, 19 : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा
योजनेच्या एका कार्यक्रम समन्वयकांचा आणि दोन स्वयंसेवकांचा राष्ट्रपती प्रणवमुखर्जी यांच्या हस्ते इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने गौरव
करण्यात आला.
राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मधे आज
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने भारताच्या माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना
पुरस्कार २०१४-१५ या वर्षाच्या पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. एनएसएसच्या
माध्यमातून उत्तम कार्य करणा-या देशभरातील ५ विद्यापीठांच्या कार्यक्रम
समन्वयकांना, १० महाविद्यालयांच्या कार्यक्रम अधिका-यांना आणि ३२ महाविद्यालयांच्या
समन्वयकांना राष्ट्रपतींच्या हस्ते
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) सर्वानंदा सोनवाल, सचिव राजीव
गुप्ता उपस्थित होते.
औरंगाबादच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.
आर. एन. करपे यांना
उल्लेखनीय कार्यासाठी या पुरस्काराने
गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील श्री. शाहजी छत्रपती महाविद्यालयाची एनएसएस
स्वयंसेविका सीमा गावडे आणि नाशिक येथील के.टी.एच.एम महाविद्यालयाचा एनएसएस
स्वयंसेवक विनायक राजगुरू यांना उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्रम
समन्वयक डॉ. आर. एन. करपे यांनी एनएसएस स्वयंसेवकांचा घडविलेला व्यक्तीमत्व विकास
आणि सामुदायिक सेवेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री. करपे यांच्या
कार्यकाळात ८० हजार ३९२ वृक्षारोपण आणि ४८ हजार ८३७ युनीट रक्तदान करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनात १५०० आरोग्य
शिबीर घेण्यात आली. महाविद्यालयात
विद्यार्थ्यांची रोडावलेली पटसंख्या सुधारण्यासाठी एनएसएसच्या माध्यमातून श्री.
करपे यांनी राबविलेला ‘चलो कॉलेज’
उपक्रम, विद्यापीठ परिसरात त्यांच्या मार्गदर्शनात बांधण्यात आलेले बंधारे, राबविण्यात
आलेला एचआयव्ही एडस जागृकता कार्यक्रम आदीं महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला. १ लाख रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे.
कोल्हापूर
येथील श्री. शाहजी छत्रपती महाविद्यालयाची एनएसएस स्वयंसेविका सीमा गावडे हीला
प्रामाणिक व सक्रीय सहभागासाठी उत्कृष्ट
एनएसएस स्वयंसेविकेच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सीमा गावडे हीने गरीब मुलांना मोफत वहया आणि कुष्ठ रोग्यांना
मोफत भोजन व कपडे वितरीत केले. स्वत: २
युनीट रक्तदान करून रक्तदान शिबीरांमधे तीने सक्रीय सहभाग घेतला. तीने एचआयव्ही
एडस, नेत्रदान, लसीकरण कार्यक्रम, पर्यावरण जागृती कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत उत्तम कार्य केले. सीमा गावडे हीच्या या
महत्वपूर्ण योगदानासाठी तीला गौरविण्यात आले. ५० हजार रूपये रोख, पदक आणि
प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक येथील के.टी.एच.एम महाविद्यालयाचा एनएसएस
स्वयंसेवक विनायक राजगुरू याच्या सक्रीय योगदानासाठी गौरव करण्यात आला. स्वत: २ युनीट रक्तदान करून
रक्तदान शिबीरांमधे त्याने सक्रीय सहभाग
घेतला. एचआयव्ही एडस, नेत्रदान, लसीकरण कार्यक्रम, पर्यावरण जागृती आदी
कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत उल्लेखनीय कार्य केले. आदिवासी विद्यार्थ्यांना
वहया, पेन्सील, कपडे आदी सामुग्रीचे वितरण केले. विनायक राजगुरु याच्या या
महत्वपूर्ण योगदानासाठी त्याला गौरविण्यात आले. ५० हजार रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र
असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
00000
No comments:
Post a Comment