नवी
दिल्ली, 19 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी
यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र
परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकस
मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा
सचिव आभा शुक्ला यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. तसेच त्यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकात्मता
दिवसाची’ शपथ दिली. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त
लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इंदिरा
गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन
केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले
तसेच त्यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकात्मता
दिवसाची’ शपथ दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे,लघु
लिपीक कमलेश पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या योगदानाबाबत उपस्थितांना माहिती
दिली. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.
00000
No comments:
Post a Comment