नवी
दिल्ली, दि. 23 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 24
डिसेंबरला रशियामध्ये आहेत. यावेळी त्यांचे स्वागत रशियन कलाकार लावणीने करणार
आहेत.
लावणी
ही महाराष्ट्राची लोककला असून सातासमुद्रापलीकडेही लावणीची ख्याती आहे. मात्र एखादया
राष्ट्र प्रमुखाचे स्वागत लावणी या लोककलेने होत असल्याची ही पहीलीच वेळ आहे.
रशियन कलाकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचे स्वागत लावणीसह इतर भारतीय लोककलांनीही करणार आहेत.
नरेंद्र
मोदी यांचे स्वागत ‘अभिनंदन’ आणि ‘अभिव्यक्ति’ या दोन कार्यक्रमांनी होणार आहे. ‘अभिनंदन’ यातंर्गत रशियन कलाकार भारतीय लोककला आणि
लोकनृत्य सादर करतील. याप्रसंगी ‘वंदे मातरम’, तसेच ‘गीत नया गाता हू’ ही
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लिखीत कविता जी लता मंगेशकर यांनी गायली, ती संगीतमयरीत्या
सादर केली जाणार आहे.
‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून रशियन कलाकार लावणी, नमस्कारम, चारिष्णु, भरतनाट्यम
रूद्र पंडत्तम, आणि कलिना तालचे सादरीकरण करणार आहेत. याशिवाय भारतीय पंरपरा,
इतिहास आणि संस्कृतीविषयी भारतीयांना असणार सार्थ अभिमान तसेच विदेशी लोकांना भारत
देशाबाबतचा असणारा जिव्हाळा व आपुलकी याचे सादरीकरण नृत्याच्यामाध्यमाने 100 रशियन
कलाकार करणार आहेत.
No comments:
Post a Comment