नवी
दिल्ली, दि. 25 : प्रत्येक अधिकारी व
कर्मचा-यांनी आपले काम प्रामाणिकपणे तसेच मनापासून करावे असे प्रतिपादन गुंतवणूकतथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र यांनी आज येथे केले.
येथील
कोपरनिकसमार्गस्थित महाराष्ट्र सदनात ‘सुशासन दिन’ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी
ते बोलत होते. याप्रसंगी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार)
डॉ. किरण कुलकर्णी, सहायक निवासी आयुक्त (सुरक्षा) अजितसिंग नेगी, व्यवस्थापक अरूण
कालगांवकर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचयकेंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
श्री
चंद्र पुढे म्हणाले, आपले काम करित असताना
सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य करावे, त्यामुळे कामात गुणवत्ता वाढते. कोणत्याही
कामाला पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केल्यास आनंद मिळतो. यासह नाविण्यपूर्ण काम
करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. सुशासन दिनानिमित्त आयोजित आजच्या कार्यशाळेत
सांगण्यात आलेल्या उपाययोजना रोजच्या कामाकाजात अमल करून नव्या जोमाने कामाला
सुरूवात करावी, असे श्री चंद्र यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सहायक
निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) डॉ. कुलकर्णी, यांनी कर्मचा-यांना सुप्रशासन , माहितीचा अधिकार आणि सुप्रशासन, तणाव
व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कर्मचा-यांशी
संवाद साधुन त्यांना कशा प्रकारे काम करायला आवडेल याबाबत दुहेरी चर्चा केली.
कर्मचा-यांना कामा दरम्यान येणा-या अडचणी जाणुन घेऊन त्यावर उपायही सूचविले.
कार्यक्रमाची
प्रस्तावना अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी केली, यावेळी त्यांनी काम करिता असताना आलेले अनुभव मांडले, व्यवस्थापक अरूण कालगांवकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment