Wednesday 30 December 2015

केंद्राकडून मुंबई सागरी मार्गासाठी अंतिम अधिसूचना जारी

   

नवी दिल्ली, दि. ३० : नरिमन पाँईट ते कांदिवली अशा ३४ किलो मीटरच्या मुंबई सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केली.   
या अधिसूचनेमुळे बरेच वर्षांपासून पर्यावरण मंत्रालयाकडे  प्रलंबीत असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाला आता गती मिळणार आहे. ही अधिसूचना निघन्यापूर्वी समुद्रामध्ये  भराव करण्यास सीआरझेड  कायद्या अंतर्गत मनाई होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्या  प्रयत्नानंतर यात दुरुस्ती करण्यात आली  . मुंबई सागरी किनारा मार्गास  तांत्रिक सहकार्य देण्यासाठी नेदरलॅण्ड सोबत सामंजस्य करार झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अंतिम अधिसूचनेच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट संदेशाद्वारे या अधिसूचनेसाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि पर्यावरण  वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत.   
 केंद्र सरकारने यावर्षी जून महिन्यात  मुंबई सागरी मार्गास अंतरिम मंजुरी दिली होती. या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सद्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक ही पश्चीम एक्सप्रेसहून होते. 


                       सागरी मार्गाबाबत महत्वाचे   
·         सागरी मार्गाचे अंतर ३४ किलो मिटर
·         नरिमन पाँइट ते कांदिवली भागातून जाणार सागरी मार्ग
·         हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित.
·         येत्या पाच ते सहा वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्धारीत
·         या प्रकल्पाद्वारे ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव
·         गर्दीच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्याकरिता सागरी मार्गात २ ठिकाणी आंतरसुमुद्री बोगदा तयार करण्यात येतील
·         या प्रकल्पातंर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार
·         पश्चिम एक्सप्रेसवरील वाहतूकीचा ताण कमी होणार 

                                                                     
                                                         ००००० 

No comments:

Post a Comment