Wednesday, 9 December 2015

शिल्पकार मुरलीधर जाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार


share

नवी दिल्ली, 9 : धातूवर उत्कीर्ण डाई शिल्पाकरिता महाराष्ट्रातील शिल्पकार मुरलीधर जाडे यांना वर्ष 2014 चा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्तालयातर्फे वर्ष 2012, 2013, आणि 2014 चे शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.
जळगावचे मुरलीधर जाडे यांचा जन्म एका पांरपारिक कारीगर कुटुंबातील झाला. धातुवर उत्कीर्ण डाई शिल्पकला त्यांनी त्यांच्या वडीलांकडून अर्जित केली. त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ही शिल्पकला शिकविली आहे. विविध राष्ट्रीय प्रदर्शणींमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या 42 वर्षांच्या योगदाणाबद्दल त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगभरात धातुवर उत्कीर्ण डाई ही दुर्मीळ शिल्पकला पांरपरिक रूपाने केवळ जळगावातील पारोळा या गावामधील जाडे कुंटूबांलाच अवगत आहे. या शिल्पाकरिता एकाग्रतेची आवश्यकता असते. डाईचा स्ट्रोक थोडा जरी चुकला की डिजाइन पुर्णपणे बिघडते. यामुळे हातांची आणि डोळयांची एकाग्रता या कामात अतिशय महत्वाची आहे.  

देशभरातील सिध्दहस्त शिल्पकारांना तथा वीणकरांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार वर्ष 1965 पासून देण्यात येत आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याचा मुख्य उद्देश सिध्दहस्त शिल्पकार तथा वीणकरांना त्यांच्या उत्कृष्ट भारतीय हस्तशिल्प आणि हस्तकला जतन करून अमुल्य योगदानाबद्दल देण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र, आणि एक अंग वस्त्रम तथा प्रमाण पत्र असे आहे. 1965 ते 2011 पर्यंत एकूण 1134 शिल्पकार आणि वीणकरांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 173 महिलांना समावेश आहे.

No comments:

Post a Comment