नवी
दिल्ली दि. 09
:
शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव
लोखंडे यांनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. लोखंडे यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे
यावेळी उपस्थित होत्या. महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती दयानंद कांबळे यांनी दिली. यावेळी श्री. लोखंडे यांना महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच
कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. लोखंडे यांनी भेट देऊन चौकशी केली.
000000
No comments:
Post a Comment