नवी दिल्ली, 11 : रेल्वेमंत्री
सुरेश प्रभु यांनी सोमवारी व्हिडीयोकॉन्फरसींगच्या माध्यमातून ‘मुंबई-काझीपेट
आनंदवन एक्सप्रेस’ या साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे गाडीला
हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
विदर्भ वासियांची ब-याच दिवसांपासून मागणी असलेल्या, मुंबईतील लोकमान्य
टर्मीनल्स ते तेलंगानातील काझीकोट रेल्वे स्थानका दरम्यान धावणा-या या रेल्वे
गाडीचा शुभारंभ रेल्वे भवनात पार पडला.
रेल्वे
राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के मित्तल आणि मुंबईचे माजी
पोलीस आयुक्त तथा खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते.याचवेळी रेल्वे भवनात लावण्यात
आलेल्या स्क्रिनवर मुंबईच्या लोकमान्य टर्मीनल्सवर उपस्थित मुंबईच्या महापौर
स्नेहल अंबेकर, खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार मंगेश कोडाळकर उपस्थित असल्याचे
दिसत होते.
याप्रसंगी बोलताना रेल्वे मंत्री म्हणाले, मुंबई-काझीपेट रेल्वे गाडी सुरु
करण्याबाबत जनतेकडून ब-याच दिवसांची मागणी होती. आज आम्ही या वर्षातील पहिलीच रेल्वे गाडी सुरु करीत आहोत
ती महाराष्ट्रातून सुरु होत असल्याचा आंनद आहे. ही रेल्वेगाडी सुरु झाल्याने
रेल्वेगाडी अभावी प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे ते म्हणाले.
अशी
धावणार ‘मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेस’
मुंबई
लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही
रेल्वे गाडी तेलंगनातील कोझीकोट रेल्वे स्थानकासाठी सुटेल. लोकमान्य टर्मिनल्सहून
सुटल्यानंतर ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामनगांव,
वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, बल्लरशा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. तेथून
सिरपूर रेल्वे स्थानकाहून ही रेल्वे तेलंगनात प्रवेश करेल मंगळवारी पहाटे ६.४५ वाजता
कोझीकोट रेल्वेस्थानकावर ही रेल्वे पोहचेल. एकूण १,११० कि.मी.चे अंतर १९ तास ०५
मिनीटात पूर्ण करताना महाराष्ट्रातील १४ आणि तेलंगनातील ७ अशा एकूण २१ रेल्वे स्थानकांवर ही रेल्वे थांबणार
आहे. परतीच्या प्रवासात मंगळवारी सायंकाळी
५. ३० वाजता कोझीकोटहून निघून बुधवारी १ .४५ वाजता ही रेल्वे मुंबईतील लोकमान्य
टर्मिनल्स वर पोहचेल.
0000
No comments:
Post a Comment