Monday, 11 January 2016

राजधानीत राजमाता जिजाऊ जयंती साजरी





नवी दिल्ली, 12 :  राजमाता जिजाऊ  यांची ४१८ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.  

            कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक भागवंती मेश्राम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रशासकीय विभागाचे उपसंचालक गणेश मुळे  यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यालयाचे कनिष्ठ लघू लेखक कमलेश पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.  उपस्थित अधिकारी  कर्मचा-यांनी राजमाता जिजाऊ  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   
                                                                     00000

No comments:

Post a Comment