Wednesday 27 January 2016

महाराष्ट्रात राखीव बटालीयन स्थापन करण्यास केंद्राची मंजुरी

                                                 
                        
नवी दिल्ली, 27 : नक्षलवादाचा सामना करण्यासाठी  महाराष्ट्रात दोन भारतीय राखीव बटालीयन (आयआरबटालीयन) स्थापन करण्यास  केंद्रीय मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवाद व डाव्या कडव्या विचारसरणीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमधे १७ भारतीय राखीव बटालीयन उभारण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार महाराष्ट्रात २, ओरीसात ३, झारखंडमधे ३, छत्तीसगढ मधे ४ तर जम्मू आणि काश्मीरमधे ५ बटालीयन उभारण्यात येतील.

            महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात स्थापन करण्यात येणा-या या बटालीयनमधे स्थानिक युवकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार राज्यसरकार शिक्षण व वयोमर्यादेमधे सूट देऊ शकते. देशात १९७१ पासून भारतीय राखीव बटालीयन योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यांमधे १५३ बटालीयन उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून  त्यापैकी १४४ बटालीयन स्थापन करण्यात आल्या आहेत.


                                                            000000

No comments:

Post a Comment