Thursday, 28 January 2016

मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी येत्या रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु



नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी येत्या रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी आज सहाकर राज्यमंत्री दादाजी भुसे यांना दिले.
        रेल्वे भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या सोबत झालेल्या भेटीमधे ब-याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-मालेगाव-धुळे-नरधना-इंदोर या 339 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी चर्चा करण्यात आली. हा रेल्वे मार्ग झाल्यास स्थानिक विकासाला गती येईल तसेच मनमाड-इंदोर अंतरही कमी होईल. महाराष्ट्रासोबत या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाशी करार झालेला आहे. मध्यप्रदेश शासनासोबत कराराची पुर्तता होणे बाकी असून लवकरच हा करार पुर्ण होईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच येत्या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाकरिता तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी यावेळी दिले. या बैठकीस खासदार हरीशचंद्र चव्हाण उपस्थित होते.
            केंद्रीय भुपृष्ठ व रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीत राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 (मुंबई-आग्रा) टेहरे तालुका मालेगाव, लळींग पुरमेपाडा, अवधान जिल्हा धुळे येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उड्डाणपूल बांधण्याबाबतची मागणी श्री भुसे यांनी केली. यासह मालेगाव येथील रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे आहेत. येथील रस्ते आशियाई मार्ग क्रमांक 47 धुळे जिल्हा यांना जोडणारे व नवापूर मार्गे गुजरातकडे जाणारे आंतरराज्य वाहतुकीसाठी सोयीचे मार्ग आहेत. या रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी श्री भुसे यांनी केली. या मागणीचा योग्य विचार केला जाईल, असे श्री गडकरी यावेळी म्हणाले.

            याशविाय राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून धुळे जिल्ह्यातील पांझरा व मालेगाव तालुक्यातील मोसम या नदयांना प्रदुषण मुक्त करण्याबाबतचे निवदेन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मंत्रालयात सादर केले.

No comments:

Post a Comment