Tuesday, 5 January 2016

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन


                                        


नवी दिल्ली, 5 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिनांक ६ जानेवारी २०१६ ला सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र सदनाच्या पत्रकार परिषद कक्षात पत्रकार दिनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

            मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ मधे दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक सुरु करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. म्हणूनच ६ जानेवारी  हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रसारमाध्यमे व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर हे प्रमुख वक्ते तर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ६ जानेवारी हा महाराष्ट्र परिचय केंद्राचा स्थापना दिवस म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. 

 00000



No comments:

Post a Comment