Monday, 22 February 2016

राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेला आजपासून सुरुवात : वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण


नवी दिल्ली दि. २२ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातून कार्यशाळेच्या उदघाटन सोहळयाचे थेट प्रक्षेपण बघता येणार आहे.
              महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल रॉयल प्लाझा येथे राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातील जनसंपर्क विभागाचे अधिकारी यात सहभागी होत आहेत. 

 दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० पासून या कार्यशाळेच्या उदघाटन सोहळयाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या www.mahanews.gov.in  या संकेतस्थळावर तसेच ॲन्ड्रॉइड मोबाईल फोन वर  http://cdn.app1.ivb7.com/hybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=74997499 या लींक द्वारे बघण्याची सोय करून देण्यात  आली आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही कार्यशाळेतील सत्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे.                                                                                            

                                               0000


No comments:

Post a Comment