Tuesday 23 February 2016

नवी माध्यमे ही प्रभावी जनसंपर्कासाठी संधी : चंद्रशेखर ओक



नवी दिल्ली, 23 : दिवसेंदिवस प्रसार माध्यमांचा विस्तार होत आहे. या माध्यमांच्या स्पर्धेत शासनाचे काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व्या माध्यमांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे,असे प्रतिपादन माहिती जनसंपर्क महासंचानालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी केले.
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाजा येथे आयोजित शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रंसगी ते बोलत होते. श्री. ओक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. संचालक शिवाजी मानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 श्री ओक म्हणाले, देशात ९० च्या दशकापर्यंत मुद्रीत माध्यमांचा प्रभाव होता, नंतर दूरचित्रवाणीचा प्रवेश होऊन देशात वृत्तवाहिन्या आल्या. आता सामाजिक माध्यामांद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. शासकीय जनसंपर्कातही आता सामाजिक माध्यमांसह अन्य व्या माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने यादिशेने सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने  सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.  
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने मागील र्षापासून देशाच्या राजधानीत राष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनास सुरुवात झाली असून देशात असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य  ठरले आहे. यावर्षीही या कार्यशाळेच्या माध्यमातून देशातील राज्यातील अधिकारी वर्गाला याचा उपयोग होणार असून विचारांच्या देवाण-घेवानतून स्परांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
        श्री. दयानंद कांबळे यांनी प्रस्ताविक भाषणात राष्ट्रीय कार्यशाळेमागील भूमिका मांडली. बदलत्या माध्यामांच्या जगात प्रभावीपणे शासकीय जनसंपर्क होण्यास या चार दिवशी राष्ट्रीय कार्यशाळेचा उत्तम उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
                        महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले पहीले आयएसओ कार्यालय
        महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली, हे कार्यालय आएसओ ९००१:२००८ प्रमाणीत झाले आहे. या कार्यक्रमात महासंचालकांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद काबळे यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या बरोबरच महाराष्ट्र परिचय केंद्र हे आयएसओ प्रमाणपत्र ्राप्त करणारे राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाचे पहीले कार्यालय ठरले आहे.
                             प्रथमच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण
आजच्या उदघाटन सोहळयाचे थेट प्रक्षेपण महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली माहिती विभागाचे  पहीले कार्यालय ठरले आहे.
  उदघाटन सत्र आणि आजच्या सत्रांचे रेकॉर्डेड लाईव्ह वेबकास्ट महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि  सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर खालील लिंकद्वारे बघता येतील.
http://cdn.app1.ivb7.com/HybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=f23076
         कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना मिरजकर यांनी केले तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले.
            महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण ३६ अधिकारी  या कार्यशाळेत सहभागी  झाले आहेत. उदघाटन सत्रानंतर आज पहिल्या सत्रात सामाजिक माध्यमे आणि जनसंपर्कया विषयावर नॅशनल मिडीया सेंटरचे संचालक बी. नारायण यांनी तर ब्लॉगींग एण्ड पर्सनल ब्रँण्डींगया विषयावर सुनिता बिध्दू यांनी  मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात कटेंट ड्रिस्टीब्युशन इन टुडेच मोबाईल वर्ड या विषयावर रजनील यांनी मार्गदर्शन केले.  दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत ही कार्यशळा चालणार आहे.
                                                                0000000
सूचना : सोबत फोटो जोडले आहेत.

No comments:

Post a Comment