Tuesday, 16 February 2016

अरूण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, दि. 16 : ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक अरूण खोपकर यांना मराठी भाषेसाठीचा वर्ष 2015 चा साहित्य अकादमी पुरस्कार मंगळवारी सांयकाळी एका शानदान कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
            येथील फिक्की स्वर्ण जयंती सभागृहात आयोजित  समारोहात वर्ष 2015 चे साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमूख  पाहूणे ज्येष्ठ उर्दू साहित्यीक गोपीचंद नारंग,  साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के श्रीनिवासराव उपस्थित होते.
            देशातील २३ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्मरणे या साहित्य प्रकारात अरूण खोपकर लिखित निबंध संग्रह चलत चित्रव्यूह या मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाची निवड करण्यात आली होती.
कोकणी भाषेकरिता उदय भेंब्रे यांच्या कर्ण पर्व या  पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यासह मुंबईत जन्मलेले साइरस मिस्त्री यांना त्यांच्या क्रॉनिकल ऑफ ए कॉर्प्स बेॲरर या  इंग्रजी कांदबरीकरिता गौरविण्यात आले. आज प्रदान झालेल्या पुरस्कारांमधे एकूण 23 साहित्यीकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.  पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.

             चलत चित्रव्यूहया पुस्तकात लघुपट निर्मिती, चित्रपट बनवणे आणि चित्रपटकलेचे अध्यापनासाठी अरूण खोपकर यांनी केलेल्या देश व जगभर प्रवासातील लेख व व्यक्तिचित्रणे लिहीलेले आहेत. वाचनाचे वेड, अफाट पुस्तक संग्रह, चित्रकला, संगीत, नृत्य यामधील व्यासंग यामुळे खोपकर अनेक कलावंताना भेटले खोपकारांनी आपल्या लेखन शैलीतून चलत चित्रव्यूह या पुस्तकाच्या माध्यमातून हा कला व्यवहार लिलया मांडला आहे.

अरूण खोपकर यांनी गुरूदत्त-तीन अंकी शोकांतिका (1995), फिगर्स ऑफ थॉट (1991)] ‘संचारी(1992), कथा दोन गनपतरावांची (1994), कलर्स ऑफ एब्सेंस(1994), सोच समझ के (1996), रसिकप्रिया (2001), नारायण गंगाराम सुर्वे (2003), हाथी का अंडा(2004),  वाल्यूम जीरो : द वर्क ऑफ चार्ल्स कोरों (2009), श्री खोपकर यांना सत्यजित रे स्मारक जीवन गौरव पुरस्कार, थर्ड आई इंटरनेशनल फिल्मोत्सव 2015 असे  विविध राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.  

No comments:

Post a Comment