नवी
दिल्ली, 14 : कोल्हापूर
येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवादशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सोमवारी
महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
दिल्ली अभ्यास दौर्यावर
असणार्या या २५ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पत्रकारिता विभागाचे समन्वयक अनिल
देशमुख यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी
औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची
वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत
खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी
साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय
प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात
येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची
उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर विद्यार्थीनी अमृता जोशी यांनी
आभार प्रदर्शन केले.
0000000
No comments:
Post a Comment