नवी
दिल्ली, दि. ३१: नागपूर मेट्रो
प्रकल्पाला जर्मन बँकेकडून ३ हजार ७५० कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे, यासंदर्भात
१ एप्रिल २०१६ रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग व जर्मनीच्या केएफडब्ल्यु बँक
यांच्यात करार होत आहे.
येथील नॉर्थब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार
विभागाच्या कार्यालयात दुपारी १२.३० वाजता केंद्र शासनाचा आर्थिक व्यवहार विभाग, केएफडब्ल्यु
बँक समूह आणि नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमीटेड(एनएमआरसीएल)च्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. करारानुसार
नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यु बँक २० वर्ष मुदतीसाठी ३,७५० कोटी रूपये(५०० मिलीयन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज
रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, विद्युत पुरवठा,
ट्रक्शन, बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार आणि केएफडब्ल्यु बँके दरम्यान होणा-या
करारानंतर नागपूर मेट्राचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी नागपूर मेट्रोरेल
कॉर्पोरेशन लिमीटेड आणि केएफडब्ल्यु बँके
दरम्यान नागपूर येथे प्रकल्प करार होणार आहे. महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास
मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या महत्वपूर्ण सहकार्याने केएफडब्ल्यु
बँक समुहाकडून हे कर्ज उपलब्ध झाले आहे.
गेल्या
वर्षी जून महिन्यात केएफडब्ल्यु बँकेच्या
वरिष्ठ अधिका-यांनी नागपूरला भेट देऊन नागपूर मेट्रो प्रकल्पाचा सखोल अभ्यास केला
होता. यानंतर सप्टेंबर २०१५ मधे केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या
आर्थिक व्यवहार विभागाने ‘ओडीए प्लस लोन’अंतर्गत
नागपूर मेट्रोसाठी केएफडब्ल्यु बँक समुहाकडून ५०० मिलीयन युरोचे कर्ज स्वीकारण्यास
मंजुरी दिली, अशी मंजुरी मिळविणारी नागपूर मेट्रो ही देशातील पहीली मेट्रो ठरली
आहे.
00000000
No comments:
Post a Comment