Friday, 29 April 2016

राजधानीत ‘महाराष्ट्र दिन समारोह’


नवी दिल्ली, २९: राजधानीत महाराष्ट्र दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० एप्रिल आणि १ मे रोजी साज-या होणा-या या समारोहात वैविद्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने‘महाराष्ट्र दिन समारोह २०१६’ चे येथील रफी मार्गस्थित मावळणकर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

या समारोहाच्या पहिल्या दिवशी दिनांक ३० एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता पुणे येथील संगीत रसिक मंडळ निर्मित ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.

दिनांक १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या पाश्चिमात्य संगीत प्रकाराची गाणी, गप्पा आदींचा उत्तममेळ घालून तयार झालेला ‘लय पश्चिमा’ हा कार्यम होणार आहे. या कार्यक्रमानंतर सुरेश साखळकर यांची संकल्पना असणारा ‘देणे गंधर्वाची’ हा बालगंधर्वांच्या जीवनातील हृद्य प्रसंगांचा संदर्भ असणा-या गीतांचा व नाटयगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
                                                   *********




No comments:

Post a Comment