Tuesday, 5 April 2016

रूपी बँक : ठेवीदारांचे पैसे बुडणार नाहीत : चंद्रकांत पाटील

                             
                                
नवी दिल्ली, दि. 5 : रूपी सहकारी बँकेच्या ठेवीदांराचे पैसे बुडणार नाहीत अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या निवास स्थानी या संदर्भात बैठक झाली. यावेळी श्री गडकरी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा, राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चळेगांवकर, रूपी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अरवींद खळदकर, बँकेचे संचालक सुधीर पंडित, श्री पराजपटटी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना सुरक्षितता प्रदान करण्यासंदर्भात गहन चर्चा करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकेच्याव्दारे रूपी बँकेवर नियंत्रण ठेवण्याच्या शक्यतेवरही विचार करण्यात आला. याबाबत केंद्रीय राज्य मंत्री श्री सिन्हा यांनी सकारात्मकता दर्शविली असून पुढील काही दिवसात या संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीनंतर दिली.   

या बँकेचे एकूण सहा लाख पंधरा हजार खातेदार आहेत. या खातेदारांचे नुकसान होऊ देणार नाही. असेही सहकार मंत्री श्री पाटील यांनी सांगितले. 

                                                          


No comments:

Post a Comment