Monday, 11 April 2016

पोलिस संशोधन व विकास विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर


     

नवी दिल्ली दि. ११: भारतीय पोलिस सेवेच्या अधिकारी तथा महाराष्ट्र शासनाच्या विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांची  पोलिस संशोधन व विकास विभागाच्या महासंचालक पदावर प्रती‍  नियुक्ती  करण्यात आली आहे.

            केंद्रीय कॅबीनेट निवड समितीच्यावतीने ही घोषणा करण्यात आली. मीरा बोरवणकर या भारतीय पोलिस सेवेच्या १९८१ च्या तुकडीच्या, महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत. १९८४ मधे नाशिकच्या सहायक पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात कामाला सुरुवात केली. राज्यातील पुणे वे नागपूर कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक तसेच विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. श्रीमती बोरवणकर  ३० ऑक्टोंबर २०१७ या त्यांच्या निवृत्ती कालावधीपर्यंत पोलिस संशोधन व विकास विभागाच्यामहासंचालक म्हणून पदभार सांभाळणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे .

                                                            000000

No comments:

Post a Comment