नवी दिल्ली, ०३ : ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी वितरण करण्यात आले. सर्वोत्कृष्ट
चित्रपटासाठी ‘बाहुबली द-बिगिनिंग’ या तेलगू
चित्रपटला सन्मानीत करण्यात आले. ‘रिंगण’ ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
माहिती व प्रसारण
मंत्रालयाच्यावतीने विज्ञानभवनात आयोजित शानदार कार्यक्रमात विविध श्रेणींमधे हे
पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा अर्थ मंत्री अरूण
जेटली, राज्य मंत्री राजवर्धन सिंह राठोड मंचावर
उपस्थित होते.
रिंगन चित्रपटाचे
दिग्दर्शक मकरंद माने आणि निर्माते तथा ‘माय रोल मोशन पिच्चर्स’ चे विठ्ठल पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला प्रत्येकी रजत कमळ आणि १ लाख
रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळयात सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार
महेश काळे यांना ‘कट्यार काळजात घुसली’
या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी प्रदान करण्यात आला, रजत कमळ आणि ५० हजार रोख
असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्कृष्ट शैक्षणिक लघूपटासाठी ‘पायवाट’ या चित्रपटाला सन्मानीत करण्यात आले, निर्माते दिग्दर्शक मिथुनचंद्र चौधरी
आणि दिग्दर्शक नयना डोळस यांनी पुरस्कार स्वीकारला, प्रत्येकी रजत कमळ आणि ५० हजार
रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘औषध’
या लघूपटाला सर्वोत्कृष्ट लघूपटासाठी सन्मानीत करण्यात आले, निर्माते दिग्दर्शक
अमोल देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला,रजत कमळ आणि ५० हजार रोख असे पुरस्काराचे
स्वरूप आहे. ‘ब्रेकींग फ्री’ चित्रपटाला
सर्वोत्तम एडीटींगच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, प्रवीण आंग्रे आणि
श्रीधर रंगायन यांनी हा पुरस्कार स्वीकारला रजत कमळ आणि ५० हजार रोख असे
पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्तम कथानकाचा पुरस्कार ‘मला लाज
वाटत नाही’ या कथानकाला मिळाला. हरिश भिमानी यांनी पुरस्कार
स्वीकारला,रजत कमळ आणि ५० हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘दारवठा’ लघूपटासाठी ,
निशांतरॉय बोंबार्डे यांना सन्मानीत करण्यात आले, रजत कमळ आणि ७५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप
आहे
नागराज मंजुळे
दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू चा विशेष
उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला. रिंकू राजगुरुला पुरस्कार स्वरूप
प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मनोज
कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपट सृष्टीत मोलाचे
योगदान देणारे ज्येष्ठ कलाकार व दिग्दर्शक मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सुवर्ण कमळ,१० लाख रूपये रोख आणि शाल असे या
पुरस्काराचे स्वरूप आहे. मनोज कुमार हे आधुनिक भारतात देशभक्तीचा अमीट चेहरा
म्हणून ओळखले जातात. मनोजकुमार यांच्या
क्रांती, उपकार, शहीद , पुरब और
पश्चिम या चित्रपटांनी भारतीयांच्या मनावर कायम गारुड केले.
भारतीय
चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटातील अभिनयासाठी
कंगना राणावतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. गेल्यावर्षीही ‘क्वीन’या चित्रपटाकरिता कंगणा रणावतला सर्वोत्कृष्ट
पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
संजयलीला
भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या
चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी
चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला सर्वोत्तम लोकप्रिय मनोरंजनात्मक चित्रपटाच्या पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले.
नृत्यदिग्दर्शक
रेमो डिसुझा यांना ‘बाजीराव मस्तानी’
चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शनासाठी सन्मानीत करण्यात आले. सर्वोत्तम संवाद लेखनाचा
पुरस्कार जुही चतुर्वेदी यांना ‘पिकू’
चित्रपटासाठी तर हिमांशू शर्मा यांना ‘तन्नू वेड्स मन्नू
रिर्टन्स’ साठी विभागून प्रदान करण्यात आला. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ या गाण्या करिता वरूण ग्रोव्हर
यांना सर्वोत्तम गीतकाराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सुजीत सावंत यांना ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील प्रोडक्शन डिसाइनसाठी
सर्वोत्तम प्रोडक्शन डिसाइनरच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अभिनेत्री कल्की कोचीन हीला बेस्ट ज्यूरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात
आले. ‘बाहुबली द-बिगिनिंग’ या चित्रपटाला
विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
चित्रपट प्रेमी राज्य म्हणून गुजरात राज्याचा गौरव करण्यात आला .
000000
No comments:
Post a Comment