नवी दिल्ली दि. २९ : देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्य म्हणून ओळख असणा-या महाराष्ट्रातील ऊस कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांची सर्वाधिक ९६ टक्के थकबाकी अदा केली आहे. महाराष्ट्रासह देशातील एकूण ऊस उत्पादक राज्यांमधे ९२ टक्के थकबाकी अदा करण्यात आल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय वाणीज्य व व्यापार मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
मंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात(२०१५-१६) देशात २३० दशलक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन झाले आहे. तर देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण ५२ हजार ९०० कोटी रूपये थकबाकी पैकी ९२ टक्के थकबाकी अदा करण्यात आली असून आता केवळ ४ हजार २२५ कोटींची थकबाकी उरली आहे. चालू गाळप हंगामा अखेर महाराष्ट्रात साखर काखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना ९६ टक्के थकबाकी अदा केली असून आता ५९० कोटींची थकबाकी उरली आहे.
अन्य ऊस उत्पादक राज्यांमधे कर्नाटक राज्यात ९४ टक्के थकबाकी अदा करण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशात ८६ टक्के थकबाकी अदा करण्यात आली आहे.
केंद्र सरकार ऊस थकबाकीबाबत सातत्यपूर्णपणे देखरेख ठेवत असून राज्यांना जलदगतीने थकबाकी देण्यासंदर्भात दिशानिर्देश देत आहे
0000
No comments:
Post a Comment