Wednesday 29 June 2016

महाराष्ट्रातील दिक्षा भूमी, महाड व चिचोलीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी


             




नवी दिल्ली दि. २९ : महाराष्ट्रातील दिक्षाभूमी, महाड आणि चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी  तसेच बौध्द धर्माशी संबंधित स्मारकांच्या विकासासाठी केंद्र शासनाने २८.८० कोटींच्या अतिरीक्त निधीला बुधवारी मंजुरी दिली आहे.
    
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज या अतिरीक्त निधीला मंजुरी दिली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त देशभर राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून डॉ. आंबेडकरांशी संबंधित देशातील  महत्वाच्या ठिकाणांच्या विकासाचे काम केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील नागपूर येथील दिक्षा भूमीच्या नुतनीकरणाच्या कामासाठी ९.४ कोटी अतिरीक्त निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हयातील  चिचोली येथील स्मारकाच्या विकासासाठी १७.०३ कोटी तर रायगड जिल्हयातील महाड या ऐतिहासिक ठिकाणाच्या विकासासाठी २.३६ कोटींच्या अतिरीक्त  निधीला मंजुरी देण्यात आली आहे.   
  000000





No comments:

Post a Comment