Wednesday 15 June 2016

हुमन प्रकल्पाबाबत राज्य वन मंडळाने नव्याने प्रस्ताव सादर करावा : जावडेकर



नवी दिल्ली, 15 :  चंद्रपूर जिल्हयातील हुमन प्रकल्पबाबत राज्य वन मंडळाने  नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केंद्रीय . केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी केल्या.
 इंदिरा पर्यावरण भवनात हुमन प्रकल्पाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची अध्यक्षता श्री जावडेकर यांनी केली.  यावेळी राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार,  आमदार संजय धोटे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव  इकबाल सिंग चहल, वन विभागाचे सचिव विकास खारगे, चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.वी. सूर्वे, तसेच मुख्य अभियंता र.. चौहान यांचासह केंद्रातील पर्यावरण व वने विभागाचे  वरीष्ठ अधिकारी   उपस्थित होते.
                        हुमन प्रकल्प हा  चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यात सिरकाडा या गावाजवळ हुमन नदीवर प्रस्तावित असणारा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वनजमीन बाधीत होत असल्यामुळे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वनेत्तर वापराकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाची अंतीम मान्यता नसल्यामुळे १९८४-८५ पासून या प्रकल्पाची कामे स्थगित करण्यात आली.  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने एक समिती नेमुन प्रकल्प परिसरातील वन्यजीवाच्या भ्रमणमार्ग उपलब्धतेबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांनी दिले.
                        वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण  (CAMPA) याच्या अंतर्गत राज्यातील वनसंरक्षण कामांसाठी १९६ रूपये आज मंजूर करण्यात आले. यासह  राज्याने पुढील तीन वर्षाचे नियोजन करावे, असे निर्देशही श्री जावडेकर यांनी यावेळी  दिले. कॉम्पाचा ठराव संसदेत मंजूर झाल्यास राज्याला यातंर्गत 2 हजार कोंटी प्राप्त होतील.

                            
                                     रेल्वेच्या जागेवर वृक्षारोपन करण्यासाठी तत्वत: मान्यता


रेल्वे भवन येथे  रेल्वे मंत्रालयाचे  वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार वनविभागाचे सचिव विकास खारगे यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली.
            रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक लवकरच वनविभागाच्या सचिवांशी याबाबत सविस्तर चर्चा करतील. तसेच यासंदर्भात लवकरच सामंजस्य करार केला जाईल. सामाजिक कॉरपोरेट निधी (सीएसआर) च्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येण्याबाबतही विचार केला जाईल, असे आजच्या बैठकीत ठरले.  याविषयातील तांत्रिक बाबींवर वन विभाग रेल्वेला पाठबळ पुरवणार. याअंतर्गत रेल्वे विभाग 5 लाख हेक्टर जागा उपलब्ध करुन देणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा प्रकल्प प्रथमच महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.

राज्यातील विविध पर्यटनविषयांबाबत
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दर्शवीली सकारात्मकता


राज्याचे  वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यातील विविध सांस्कृतिक आणि पर्यटनविषयांबाबत केंद्रीय संस्कृती तथा पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सर्वच संस्कृतीक तसेच पर्यटनविषयांबाबत केंद्रीय मंत्री यांनी सकारात्मकता दर्शवीली.
श्री मुनगंटीवार  यांनी आज परीवहन भवनात केंद्रीय  संस्कृतीक तथा पर्यटन मंत्री श्री शर्मा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हयांचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, केंद्रीय विभागातील विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील नांदेड येथील शिख धमींयांचे तीर्थक्षेत्र आहे. भारतातील तसेच जगभरातीलशिख भावीक येथे दर्शनासाठी येतात. येथे विमानतळाला मान्यता मिळावी. दिल्ली-पुणे-नांदेड, दिल्ली- नागपूर-नांदेड जो मार्ग सुविधाजनक असेल तो सुरू करून देण्यात यावाअशी मागणी राज्याच्या वतीने करण्यात  आली. यावर केंद्रीय  मंत्री श्री शर्मा यांनी सकारात्मकता दर्शवीली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.  
मुंबई येथील अंतरराष्ट्रीय विमातळावर मोठया प्रमाणात वर्दळ असते. ही वर्दळ थोडया प्रमाणात कमी व्हावी याकरिता जुहू येथील विमानतळाचा विकास करण्यात यावा, या मागणीबाबतही  श्री शर्मा यांनी सकात्मक आश्वासन दिले.
वर्धा जिल्हयातील सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक वेळ व्यतीत केला आहे.  महात्मा गांधी 1933-48 या दरम्यान होते.  येथील आश्रामाचा कायापालट व्हावा यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी श्री मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. यासह राज्यातील शिवकालीन किल्ल्यांची देखभाल, रखरखाव, सुशोभीकरणासाठी निधी मिळण्याची मागणीवरही केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवीली.
राज्यातील महामार्गावरील मोकळया  जागेत  वृक्षारोपन करण्याबाबतची परवानगी  केंद्रीय  महामार्ग व परीवहन मंत्री श्री गडकरी यांनी दिली. याबाबतचा सामंज्यस करार लवकरच होणार असल्याचे श्री मुनगंटीवार यांनी बैठकी नंतर सांगितले.



No comments:

Post a Comment