नवी
दिल्ली, 15 : चंद्रपूर
जिल्हयात सैनिकी शाळा उभारण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि
महाराष्ट्राचे वित्त-नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांच्यात बुधवारी सामंजस्य करार झाला.
साऊथ ब्लॉक
येथे आज श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट
घेतली. या भेटी दरम्यान चंद्रपूर जिल्हयात सैनिकी शाळा उभारण्यासाठी उभय मंत्र्यांमधे सामंजस्य करार झाला.
यावेळी वनविभागाचे सचिव विकास खरगे,
संरक्षण मंत्रालयाच्या मानद सैनिकी शाळा समितीचे उपसचिव( प्रशिक्षण) सुभाष
चंद्रा, सैनिक शाळा समितीचे निरीक्षण अधिकारी
कॅप्टन रामबाबू,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील उपस्थित होते.
महाराष्ट्रात सातारा येथे १९६१ मधे
देशातील पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली. आजच्या सामंजस्य करारानंतर चंद्रपूर जिल्हयात
सैनिकी शाळा स्थापन होणार असून देशातील ही २६ वी सैनिकी शाळा असणार आहे.
मराठवाडयात ‘इको बटालीयन’ मिळावी
महाराष्ट्रातील मराठवाडा
भागात ‘इको बटालीयन’ मिळावी अशी मागणी श्री. सुधीर
मुनगंटीवार यांनी श्री. पर्रीकर यांच्याकडे केली. ज्या भागात एकूण क्षेत्रफळाच्या
तुलनेत वनक्षेत्र हे २ टक्क्यांपेक्षा कमी आहे तिथे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने
वृक्ष संवर्धन व वाढीसाठी ‘इको बटालीयन’ आहेत. देशात उत्तराखंड,आसाम आणि दिल्ली येथे अशा प्रकारच्या बटालीयन आहेत.
याच धर्तीवर महाराष्ट्रात इको बटालीयन मिळावी मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल
असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले. १ जुलै
२०१६ रोजी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण श्री मुनगंटीवार यांनी श्री. पर्रीकर यांना
दिले.
No comments:
Post a Comment