नवी
दिल्ली 30 : पर्यटनाला प्रोत्साहन
देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल छत्रपती
शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2014-15 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार लोकसभा
अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विज्ञान
भवनात आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2014-15
चा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा
महाजन, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा
विभाचे सचिव तसेच ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील
‘छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळा’ ला
देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट
सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी
अंतरराष्ट्रीय विमानतळाचे कॉरपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी
आणि एरो मार्केटींगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी स्वीकारला.
छत्रपती
शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिममध्ये असणा-या 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील
85 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी अतंरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते.
पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.
विविध श्रेणीत महाराष्ट्रातील ‘केसरी टूर्स’ ला
पुरस्कार
भारताचे
नंदनवन असणा-या काश्मीरामध्ये सर्वाधिक पर्यटक वर्ष 2014-15 मध्ये घेऊनसाठी
‘केसरी टूर्स’ ला पुरस्कृत
करण्यात आले. केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील आणि सूनिता पाटील यांनी हा
पुरस्कार स्वीकारला. त्यांनी 2014-15 मध्ये 7481 पर्यटकांना काश्मीरची सहल घडविली
आहे. हा पुरस्कार त्यांना सलग दुस-या वर्षी मिळाला आहे.
महाराष्ट्राचे सुपूत्र ‘शेफ मच्छिंद्र कस्तूरे’ यांचा सन्मान
‘जेवण बनविणे ही कला आहे आणि कलाकार म्हणून कलेला विकसीत करत राहणे’ माझे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रीया देशातील उत्कृष्ट शेफ म्हणून पुरस्कृत
झालेले ‘शेफ मच्छींद्र उमाकांत कस्तुरे’ कार्यकारी शेफ, द अशोका हॉटेल यांनी दिली.
मच्छींद्र
कस्तूरे हे मुळचे पुण्याचे आहेत. 1980 च्या दशकात हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात शिरून
या क्षेत्रातील विविध ठीकाणी काम करून भारत सरकारच्या ‘भारतीय पर्यटन विकास मंहामडळा’ त शेफ म्हणून रूजू
झाले आणि येथून श्री कस्तूरेच्या कारकीर्दीला नवीन वळण लागले, पर्यटन विकास
मंहामंडळ अंतर्गत येणारे बिहार, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्रातील हॉटेल्समध्ये
काम केले.
दिल्ली
येथील अशोका हॉटेलमध्ये बदली झाली आणि श्री कस्तूरे यांना आणखी एक संधी मिळाली.
राष्ट्रपती भवनात मुख्य शेफ म्हणून काम करण्याची. श्री कस्तूरे हे प्रथम असे शेफ
आहेत ज्यांनी राष्ट्रपती भवनात काम केले. तीथे त्यांनी अद्यावत किचन यंत्रणा
उभारली. राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी मेजवाणी
त्यांनी केलेली आहे. राष्ट्रपती भवनात श्री कस्तूरे यांनी चीफ शेफ म्हणून 2008 ते
2014 पर्यंत काम केले आहे.
No comments:
Post a Comment