Monday, 4 July 2016

खतांचे दर कमी झाल्यामुळे शेतक-यांना मिळणार दिलासा : रसायन व खते मंत्री अनंत कुमार

         

नवी दिल्ली दि. ०४ : खंताचे दर अपक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार, असल्याचे केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी, आज सांगितले 
            केंद्रीय रसायन व खते मंत्री यांनी शास्त्री भवनातील त्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषद ही माहिती दिली. यावेळी राज्य मंत्री हंसराज अहीर, सचिव विजय शंकर पांडे, सह सचिव धर्मपाल पांडे उपस्थित होते 
            श्री कुमार यांनी सांगितले, वर्तमानात असलेले डी..पी., एम.पी.ओ., एन.पी.के. खंताचे दर कमी करण्यात आले आहे. डी.ए.पी. च्या खताचे दर कमी केले असून आता मेट्रिक टन मागे दोन हजार पाचशे रुपये वाचतील तर प्रत्येक पोत्या मागे १२५ रुपये दर कमी होईल. एम.पी.ओ च्या खतांमध्ये प्रत्येक मेट्रीक टनामागे पाच हजार रुपये कमी दयावे, लागतील. प्रत्येक पोत्या मागे २५० रुपये दर कमी आकारला जाईल. यासह एन.पी.के खतांमध्ये प्रत्येक मेट्रीक टनामागे एक हजार रुपये कमी दर राहील व प्रत्येक पोत्या मागे ५० रुपये कमी होईल. यामुळे येणा-या खरीप हंगामात शेतक-यांना फायदा मिळेल, असे श्री अनंत कुमार म्हणाले. खतावरील दर कमी करण्यासाठी वेगवेगळया स्तरावर उत्पादकांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री कुमार यांनी सांगितले.  
             रसायन व खते मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे ४५०० कोटीचा लाभ होईल, असा अंदाज श्री कुमार यांनी  व्यक्त केला.
            मागील १५ वर्षापासून खतांवरील दर कमी झाले नाहीत. आता कमी झालेल्या या दरामुळे तसेच नीम कोटेड यूरीया वापरामुळे युरीया वापराचे प्रमाण 10-15 टक्क्यांनी कमी  झाले आहे. याचा परिणाम जमीनीची सुपीकता वाढविण्यात मदद होत असल्याचेही श्री कुमार यांनी  ही सांगितले.

 राज्यातील ऊस, कांदा, कापूस, केळी उत्पादक शेतक-यांना होणार फायदा :                                                                       हंसराज अहीर
खतांवरील दर कमी केल्यामुळे राज्यातील ऊस, कांदा, कापूस, केळी उत्पादक शेतक-यांना फायदा होणार असल्याचे रसायन व खते राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. 
            डी.ए.पी या खतांचा वापर केळी, कांदा, कापसाचा शेतीसाठी केला जातो. भाजीपाला वर्गीय पीकांसाठी एम.पी. ओ. हे खत वापरले जाते.  या खतांचे दर कमी झाल्यामुळे राज्यातील शेतक-यांना दिलासा मिळेल. विर्दभात कापूस, मराठवाडयात ऊस, कोंकण खानदेश केळी, कांदयांची शेती मोठयाप्रमाणात केली जाते. खतांवरील दर कमी झाल्यामुळे राज्यातील शेतक-यांना फायदा होईल. लवकरच खरीप हंगाम सुरु होणार आहे. दर कमी झाल्यामुळे शेतक-यांना दुहेरी फायदा मिळेल. कमी दरात खते व उत्पादनात वाढ होईल. 

00000

No comments:

Post a Comment