श्री अहीर यांनी आज गृहराज्यमंत्री पदाचा पदभार
ग्रहण केला
नवी
दिल्ली, दि. 11 : गृह राज्य
मंत्रीपद हे संवेदनशील असे पद असून या पदाला न्याय देण्याचा आणि पदाची गरीमा
वाढविण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही हंसराज अहीर यांनी आज दिली.
नार्थ ब्लॉक स्थित गृह मंत्रालयाच्या
कार्यालयात गृह राज्य मंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर माध्यमांशी बोलताना
श्री अहीर म्हणाले. यावेळी गृह राज्य मंत्री किरेण रिजीजू उपस्थित होते.
श्री अहीर यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर
आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले, गृहराज्य मंत्री म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी
सोपविण्यात आली आहे. देशाची आंतरीक तसेच
बाहय सुरक्षा अबाधीत राखण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात
त्यांच्यात एकता आणि अखंडता राखण्याचा प्रयत्न करेल.
श्री अहीर हे स्वत: नक्षलग्रस्त
जिल्हयांचे प्रतिनिधीत्व करीत असून त्या क्षेत्रातील समस्यांचा जवळून अनुभव व
अभ्यास असलयाचे सांगत, भविष्यात नक्षलग्रस्त
भागातील समस्या सोडविण्याच्या दिशेने
सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असे श्री अहीर यांनी यावेळी सांगितले.
हसंराज अहीर यांच्याकडे यापूर्वी रसायने व
खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार होता.
No comments:
Post a Comment