Thursday, 7 July 2016

सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच आमच्या मंत्रालयाचे ध्येय : प्रकाश जावडेकर



नवी दिल्ली दि. : कोणत्याही समाजाचा पाया हा शिक्षणावर अवलंबून असतो म्हणून आमच्या मंत्रालयाचे ध्येय सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे असेल, असे मत नवनियुक्त केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.  
            शास्त्रीभवन स्थित मनुष्यबळ विकास मंत्रालयात गुरुवारी सकाळी प्रकाश जावडेकर यांच्यासह नवनियुक्त राज्यमंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांनी पदभार स्वीकारला.मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्यासह प्रकाश जावडेकर यांच्या पत्नी श्रीमती प्राची आणि मुलगा अपूर्व जावडेकर यावेळी उपस्थित होते.
            पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री.जावडेकर म्हणाले, देशात जवळपास १३ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ,देशात उत्तम शिक्षीत पिढी घडविण्याची शिक्षण मंत्रालयाची महत्वाची जबाबदारी आहे. या पिढीली गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही तिनही मंत्री एकत्रपणे सांघिक भावनेने काम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
१० जुलै ला पुण्यात शिक्षकांचा करणार सन्मान
श्री. पी.एल. गावडे, अनिरूध्द देशपांडे यांच्यासह आपल्याला शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना शिकविणा-या शिक्षकांचा सन्मान करून आपण आपल्या मंत्रालयाच्या कार्याला सुरुवात करणार असल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले. १० जुलै २०१६ ला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्पीथिएटर मधे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
                                        00000  


No comments:

Post a Comment