नवी
दिल्ली, 1 : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने
महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक
उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी केली.
शास्त्रीभवन
स्थित सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात श्री. आठवले यांनी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहीली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
श्री. आठवले म्हणाले, केंद्रात मंत्री झाल्यानंतर प्रथमच सामाजिक न्याय मंत्रालयात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली जिल्हयातील
वाटेगांव या छोटयाशा गावात जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांनी हलाकीच्या परिस्थितीचा
सामना करून प्रतिभेच्या जोरावर साहित्यक्षेत्रात मोठा लौकीक मिळविला. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या
माध्यमातून झालेल्या आंदोलनामध्ये अण्णाभाऊंनी सक्रीय सहभाग घेतला होता. संयुक्त
महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अण्णाभाऊंनी साहित्य
क्षेत्रात दिलेले योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या सिमा ओलांडून
त्यांनी रशियाचे तत्कालीन प्रमुख लेनीन गार्द यांच्यावर पोवाडा लिहीला जो रशियन भाषेतही प्रसिध्द असल्याचे
श्री. आठवले म्हणाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे
सामाजिक आणि वाड:मयीन योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा व
त्यांचे कार्य येणा-या पिढयांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रात
त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment