नवी दिल्ली, 1 : लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक आणि वाड:मयीन मांडणी वैश्विक उंचीची असल्याचे प्रतिपादन
डॉ. मिलींद आवाड यांनी केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत
होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, वरिष्ठ पत्रकार आणि विविध
क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. आवाड म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांचे लिखान हे वर्ग,जाती, लिंग,भाषा या सर्व जाणीवांतून येते. स्त्री, शुद्र आणि
शुद्रातीशुद्र यांचे दु:ख मांडणारे अण्णाभाऊंचे लिखान वर्गीय जाणीवेतून जातीय
जाणीवा उलगडते. त्यामुळेच अण्णाभाऊंचे वाड:मय हे वैश्विक उंचीचे ठरते. ‘माझी मैना गावाकडे राहिली....’या कलाकृतीतून
अण्णाभाऊ असंघटीत कामगारांचे दु:ख मांडतात. जात आणि वर्गाची सांगड घालणा-या
भारतातील विचारवंतामध्ये अण्णा भाऊंचे नाव सन्मानाने घेतले जाते. सांस्कृतिक
जीवनामुळे होणारे भौतिक शोषण हा महात्मा फुलेंच्या वाड:मयीन लिखानाचा धागा पकडत
त्याचा विस्तार अण्णाभाऊंनी केल्याचे डॉ.आवाड म्हणाले.
श्री.
दयानंद कांबळे यावेळी म्हणाले,अण्णाभाऊ साठे यांनी जातीयतेच्या भितीं तोडण्याचे
काम आपल्या लिखानातून प्रभावीपणे केले आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी
त्यांनी लेखनीचा प्रभावी वापर केल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानावर
त्यांनी प्रकाश टाकला.
माहिती
अधिकारी अंजू कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांसह कार्यालयात
उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प
अर्पण करून अभिवादन केले .
महाराष्ट्र सदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र,सहायक
निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, भारती झाडे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी
कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000
No comments:
Post a Comment