नवी दिल्ली, १५ : भारताचा ७० वा ‘स्वातंत्र्य दिन’ राजधानीतील महाराष्ट्र सदन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांच्या हस्ते कस्तुरबा गांधीमार्ग तथा कोपरनिकस मार्गावरील दोन्ही महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीत झाले. महाराष्ट्र सुरक्षा पोलीसांच्या तुकडीने यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. सदनात निवासी अतिथी तसेच, महाराष्ट्र शासनाचे दिल्लीस्थित विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारीही यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
राजधानीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
0000
No comments:
Post a Comment