Monday, 15 August 2016

महाराष्ट्राच्या हस्तकलेला पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद




नवी दिल्ली, 15: भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात महाराष्ट्राच्या दालनास 15 हजाराहुन अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटीग, पुणेरी कॉटन साडी, लाखाच्या बांगड्या आदी महाराष्ट्रातील हस्तकलांना दिल्लीत येणारे पर्यटक व दिल्लीकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनास बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस असून प्रदर्शनास भेट देणा-यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास गर्दी केली. इथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील लघुउद्योजक  व हस्तकलाकारांच्या कामांचे प्रदर्शन व विक्रि सुरु आहे. पुणेरी कॉटन साडी, लाखाच्या बांगड्या, वारील पेंटीग आणि कोल्हापुरी चप्पल स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे  चित्र होते.
केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्हयाच्या दुरस्थ शिक्षण समन्वयक डॉ रेणू सांगतात, त्यांना पुणेरी पॅटर्नची कॉटन साडी फार आवडली. त्या सध्या दिल्लीत फिरायला आल्या असून भारत पर्व प्रदर्शनीत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास भेट दिली. या दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पैठणीसह राज्यातील साडयांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. डॉ रेणु सांगतात, पुणेरी पॅटर्न कॉटन साडीचा रंग संगती आणि रचना उत्तम असल्याने ही साडी आवडली म्हणूनच मी ही साडी खरेदी केली. महाराष्ट्राच्या साडयांबददल नेहमीच आकर्षण वाटत असून महाराष्ट्र दालनात प्रत्यक्ष खरेदीची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आर.के.पुरम भागातील रहिवाशी लता पाराशर यांनी मोठ्या प्रमाणात लाखाच्या बांगड्या  खरेदी केल्या. त्यांच्या सेाबत त्यांच्या अन्‌य तीन मैत्रिणींनीही बांगड्या घेतल्या. श्रीमती पाराशर म्हणाल्या, लाखाच्या बांगड्यांची गुणवत्ता भावली. उत्तम रंग, कलाकुसर आणि परवडणारी किंमत यामुळे या बांगड्या आम्ही सर्व मैत्रिंनीनी विकत घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठीही  या बांगड्यांची विशेष खरेदी करुन घेतली. भारत पर्वच्या निमित्ताने विविध राज्यांच्या कलावस्तु खरेदी करायला मिळत आहे त्यात महाराष्ट्रातील हस्तकला आम्हाला विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले.
शाळकरी मुला-मुलींची मोठी गर्दीही हस्तकला दालनास बघायला मिळाली. दिल्लीती शक्तीनगर भागातील 11 वीत शिकणा-या नेहा रहेजा ला या दालनात वारली किचन भावले आणि तीने या किचनवर नाव लिहुन घेतले व किचन विकत घेतले. आयुष्यात कला पहिल्यांदाच वारली पेटींग म्हणजे काय हे कळले. वारली आकृत्या मला फार आवडल्या म्हणूनच मी येथील स्टॉलवरील वारली किचन वर कलाकाराकडून स्वत:चे नाव लिहुन घेतले. आता माझ्याजवळ किचन स्वरुपात वारली पेटींग राहील असे नेहा सांगते.
दिल्लीतील उत्तमनगर येथे राहणारे अमरप्रकाश जोशी यांनी कोल्हापूरी चप्पल खेरदी केली. हिंदी चित्रपटामधून मला कोल्हापूरी चप्पलची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पलबाबत माझ्या  वाचनातही आले होते. आज महाराष्ट्र दालनात कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद असल्याचे ओमप्रकाश  सांगतात.   



No comments:

Post a Comment