मनीषा
म्हैसकर यांनी स्विकारले “अमृत” चे
मानपत्र
नवी
दिल्ली, 30 : अटल नागरी पुर्नर्निमाण व परिवर्तन “अमृत” योजनेंतर्गत
महाराष्ट्राला 45.57 कोटी प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली.
विज्ञान भवन येथे आज “इण्डोसन”
भारतीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या दुस-या
सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय नागरी मंत्री एम. वैंकय्या नायडू हे उपस्थित
होते. यावेळी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय नगर
विकास राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग, केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री रमेश
चंदप्पा जीगाजिनागी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, छत्तीसगडचे
मुख्यमंत्री रमण सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते.
“अमृत” योजनेंतर्गत
राज्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वैंकय्या
नायडू यांच्याहस्ते महाराष्ट्राला मानपत्र प्रदान करण्यात आले. हे मानपत्र नगर
विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्विकारले.
“अमृत”
मिशन योजनेतंर्गत महाराष्ट्राला 45.57 कोटी रक्कम प्रोत्साहनपर देण्यात आली. अटल
नागरी पुर्ननिर्माण व परिवर्तन “अमृत” योजनेंतर्गत
उल्लेखनीय कामगिरी करणा-यांमध्ये 19 राज्य
आणि 1 केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. प्रोत्साहनपर रक्कम ही योजनेंतर्गत
मिळणा-या रक्कमे व्यतिरिक्तची अतिरिक्त रक्कम आहे. “अमृत”
योजनेंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर रक्कम ही केवळ अमृत योजनेमधील नवीन प्रकल्प,
प्रकल्पांमधील सुधारणा आणि क्षमता विकासासाठी खर्च करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment