नवी
दिल्ली दि. २७ : महाराष्ट्र
शासनाचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले बाळासाहेब बिन्नर यांचा परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. बिन्नर हे अहमदनगर जिल्हयातील अकोले
तालुक्यातील सावरगांव पाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून
कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.
आदिवासी विभागातून १९ शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली असून श्री.
बिन्नर यांचा यात समावेश आहे. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.
बिन्नर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे,
दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी , आनंद रेखी यावेळी उपस्थित होते.
श्री. बिन्नर यांना यावेळी परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली.
विविध मान्यवरांनी परिचय केंद्राला भेट दिली
अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा अकोले कृषी
उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पर्बतराव नाईकवाडी, अकोले येथील अमृतसागर दूध
संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे आणि अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रामनाथ
मुर्तडक यांनी परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी या मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. दैनिक सामनाचे दिल्ली
प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, आनंद रेखी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. कांबळे यांनी या मान्यवरांना दिली. मान्यवरांना महाराष्ट्र परिचय केंद्राची
प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या
विविध विभागांना मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
000000
No comments:
Post a Comment