Thursday 22 September 2016

राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे नुतनिकरण आवश्यक : वित्त मंत्री मुनगंटीवार










नवी दिल्ली22 : राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे नुतनिकरण व  सौंदर्यीकरण आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाच्या आवश्यक परवानग्या मिळाव्यात अशी मागणी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यटन व संस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याशी आज  शास्त्री भवन येथे झालेल्या बैठकीत केली.   
आज झालेल्या या भेटीमध्ये रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड राजाने बांधलेला किल्लाबल्लारपूर येथील राणी महलगडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेश्वर मंदीराचे नुतनिकरण व सौंदर्यीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
श्री मुनंगटीवार म्हणालेरायगड किल्ला आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी हे किल्ले श्रध्दा व स्फुर्तीचे स्थान आहेत. लाखोंच्या संख्येने पर्यटक हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी येतात. या किल्ल्यांचा इतिहास 350 वर्ष जूना आहे. हे शिवाजी कालीन किल्ले आजही मजबूत आहेत. मात्र,  या किल्ल्यांचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण करणे आवश्यक आहे. याकामी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यास केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याची बाब श्री.मुनगंटीवार यांनी डॉ.शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्य शासनाच्या या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्राकडून आवश्यक मदत दिली जाईल असे आश्वासन यावेळी डॉ. शर्मा यांनी दिले.  
चंद्रपूर येथील गोंड राजाने बांधलेला ऐतिहासिक किल्ला शहरात आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी राज्यशासनाला रस्ता बांधण्याच्या परवाणगी सह या किल्ल्यांचे सौंदर्यीकरण व प्रकाश योजनेबाबत  परवानगी मिळावी. बल्लारपूर किल्ल्याचे सौंदर्यीकरणनुतनीकरण व पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्यांचा विकास करणे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेश्वर मंदीराचा पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून विकास करणे याबाबतही श्री.मुनगंटीवार यांनी या चर्चे दरम्यान लक्ष वेधले. यासर्व ठीकाणी पुरातत्व विभागाचे अधिकारी आढावा घेण्यासाठी पाठविण्याचे आश्वासन श्री शर्मा यांनी या बैठकीत दिले. यावेळी पुरातत्व विभागाचे अतिरीक्त महासंचालक शरद शर्मा उपस्थित होते.
सेवाग्रामच्या विकासासाठी निधी मिळावा
                                       सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती 2019 मध्ये साजरी करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांनी   1933 ते 1948 दरम्यान सेवाग्राम येथे वास्तव्य केले होते. गांधीजींनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ हा सेवाग्राम येथे व्यथित केला. त्यामुळे सेवाग्रामचे विशेष महत्व आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सेवाग्राम विकास आराखडा आखला आहे. त्यासाठी 266 कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला आहे. या आराखड्यातील दोन तृतीयांश खर्च केंद्र शासनाने उचलावा अशी मागणी श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी केली. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. महेश शर्मा यांनी दिले.
0000

No comments:

Post a Comment