Monday, 31 October 2016

सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पूण्यतिथी साजरी



नवी दिल्ली, ३१ : देशाच्या  माजी  पंतप्रधान इंदिरा गांधी  यांची पूण्यतिथी आणि देशाचे पहीले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.
                कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय,सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
            सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी - कर्मचा-यांना निवासी आयुक्त तथा सचिव यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.  दक्षता जनजागृती सप्ताह ची सुरूवातही आजपासूनच होत असल्यामुळे यानिमित्ताने  राज्यपाल चे. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचे वाचनही करण्यात आले.

    

No comments:

Post a Comment