नवी
दिल्ली, दि. 29 : महाराष्ट्र परिचय
केंद्राचे लेखापाल श्यामसुंदर वैद्य नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त झाले असून आज
त्यांना कार्यालयाच्यावतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
श्री. वैद्य यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्रात एकूण ३२ वर्ष सेवा दिली. नियतकामा सोबतच श्री. वैद्य यांनी कार्यालयाच्या
विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी कार्यालयाच्यावतीने श्री. वैद्य यांचा सत्कार केला व त्यांना भेट वस्तू
दिली. श्रीमती वैद्य यांचा सत्कार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे
यांनी केला व त्यांना भेट वस्तू दिली. परिचय केंद्रातील श्री. वैद्य यांचे जुने
सहकारी आणि परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
श्री. वैद्य यांच्या सोबत
दिर्घकाळ कार्य करणारे सहकारी कर्मचारी व अधिकारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त
केले.
००००००
No comments:
Post a Comment