नवी
दिल्ली 1 : राजधानी दिल्लीत 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान मराठी
संगीत नाटय महोत्सव होणार आहे. यामध्ये ‘संशय कल्लोळ’ आणि ‘स्वयंवर’ हे दोन संगीत
नाटक सादर होणार आहेत.
संगीत नाटक
अकादमी आणि सार्वजनिक उत्सव समिती यांच्या
संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र नाटय संगीत’ उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. रविंद्र भवन येथील मेघदूत नाटयगृहात ही संगीत नाटके सादर केली
जाणार आहे.
यंदाचे वर्ष नाटयचार्य काकसाहेब खाडिकर लिखित ‘स्वयंवर’ आणि गोविंद बल्लाळ लिखित ‘संशय कल्लोळ’ नाटकांचे शताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांची
ही दोन नाटके दाखविण्यात येणार आहेत. ‘संशय कल्लोळ’ हे नाटक 4 नोव्हेंबरला तर ‘स्वयंवर’ हे 5 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दाखविण्यात येईल.
6 नोव्हेंबरला 4 वाजता माधवी वैद्य दिग्दर्शीत ‘मराठी नाटय संगीता’वर आधारित वृत्तचित्र प्रदर्शन मेघदूत- IV या सभागृहात असणार आहे. तसेच याच दिवशी सहा वाजता ‘मराठी नाटय संगीत का सौदर्यंबोध’ हिंदीत डॉ. वसंतराव
देशपांडे प्रतिष्ठान पुणे हे सादर करणार आहेत.
नाटक तसेच कार्यक्रम निशुल्क आहेत. अधिकाधिक प्रेक्षकांनी
नाटक आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
No comments:
Post a Comment